active teacher

Wednesday, 2 July 2025

Thursday, 18 July 2024

आनंददायी शनिवार उपक्रम दिनांक 20 जुलै

 



⭕शारीरिक कसरत 30 मिनिटे

योग, प्राणायाम, बैठे व्यायाम प्रकार

विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी घेणे.



⭕ वित्तीय व्यवस्थापन 10 मिनिटे

रुपये आणि पैसे यांची ओळख. 

सुटे पैसे कसे करतात त्याची माहिती.

आर्थिक व्यवहारांची माहिती.


⭕इंग्रजी 30 मिनिटे 

C या अक्षराचे क आणि स या उच्चारा विषयी मार्गदर्शन. 

            जेव्हा कोणत्याही स्पेलिंग मध्ये c नंतर a, o, u हे स्वर आणि y हे व्यंजन सोडून इतर कोणतेही व्यंजन आल्यास c चा आवाज क असा होतो.

cat , cock, cup, camp, cute, cot, copper, carrom

           जेव्हा कोणत्याही स्पेलिंग मध्ये c नंतर e, i हे स्वर आणि y आल्यास c आवाज स असा होतो.  

centre, cement, cell, cent, rice, 

circle, city



⭕कृती आणि खेळ 20 मिनिटे

आजचा मनोरंजक खेळ

कप पासिंग गेम

कप पासिंग खेळ लिंक



⭕वाचन 30 मिनिटे

15 मिनिटे वाचन

थोरांचे जीवन पुस्तकांचे वाचन आणि त्यावर चर्चा घेणे. 

विविध थोर व्यक्तींचे जीवन कसे होते ? त्यांना कोणता संघर्ष करावा लागला? त्यांनी कोणते चांगले काम केले ? त्यांच्याकडून आपण कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजेत याविषयी सविस्तर चर्चा करणे.


⭕इंग्रजी पेटी 30 मिनिटे 

पेटीतील साहित्याचा सराव 

इंग्रजी पेटीतील साहित्य मुलांना हाताळायला देणे. त्यावर आधारीत विविध खेळ, कृती घेणे. 

इंग्रजी पेटीतील साहित्य खेळ, उपक्रम व्हिडिओ साठी इथे क्लिक करा .



⭕पूर्ण दिवसभर घेण्यासाठी विशेष उपक्रम

गुरुपौर्णिमा कार्यक्रम घेणे.


Friday, 12 July 2024

आनंददायी शनिवार दिनांक 13 जुलै उपक्रम




शारीरिक कसरत 30 मिनिटे
योग, प्राणायाम, बैठे व्यायाम प्रकार
विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी घेणे.


आपत्ती व्यवस्थापन 10 मिनिटे
महापूर आणि भूकंप माहिती आणि घ्यावयाची काळजी  


इंग्रजी 30 मिनिटे 
व्यंजने आणि त्यांचे उच्चार
इंग्रजीतील सर्व व्यंजने आणि त्यांचे उच्चार यांची माहिती देणे. वाचन घेणे. 


कृती आणि खेळ 20 मिनिटे
आजचा मनोरंजक खेळ
पुठ्ठा शर्यत 


वाचन 30 मिनिटे
15 मिनिटे वाचन
ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन आणि त्यावर चर्चा घेणे. 
सारांश, एखादा प्रसंग, पात्रांची नावे लेखन इत्यादी गोष्टी घेणे.


इंग्रजी पेटी 30 मिनिटे 
पेटीतील साहित्याचा सराव 
इंग्रजी पेटीतील साहित्य मुलांना हाताळायला देणे. त्यावर आधारीत विविध खेळ, कृती घेणे. 


पूर्ण दिवसभर घेण्यासाठी विशेष उपक्रम
क्षेत्रभेट 
***************************************